पटेल रिटेलच्या यशस्वी आयपीओ नंतर स्थानिक उद्योजक भरत पटेल यांचे अंबरनाथ विधानसभा युवासेना अधिकारी राज प्रकाश महाडिक यांनी भेट घेऊन केलेले गतफुला अभिनंदन”
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
अंबरनाथ, ५ सप्टेंबर:
युवासेना – शिवसेना उद्धवजी ठाकरे पक्षाचे अंबरनाथ विधानसभा अधिकारी राज प्रकाश महाडिक यांनी आज स्थानिक उद्योजक भरत पटेल यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. पटेल रिटेल लिमिटेड मागील महिन्यात स्टॉक एक्स्चेंजवर यशस्वीपणे लिस्ट झाले होते.
राज महाडिक म्हणाले, “भरतभाई पटेल व त्यांच्या कुटुंबाचे हे यश केवळ व्यक्तिगत नसून संपूर्ण अंबरनाथच्या उद्योजकतेचे एक आदर्श उदाहरण आहे. एका छोट्या दुकानातून सुरुवात करून राष्ट्रीय बाजारपेठेत स्थान निर्माण करण्याची त्यांच्या कंपनीची वाटचाल प्रेरणादायी आहे.”
२००८ मध्ये स्थापन झालेली पटेल रिटेल ही एक रिटेल सुपरमार्केट साखळी आहे. कंपनी प्रामुख्याने टियर-तीन शहरे आणि आसपासच्या उपनगरीय भागात कार्यरत आहे. तिचे स्टोअर अन्नपदार्थ, दैनंदिन वापराच्या वस्तू, कपडे इत्यादी विकतात. कंपनीचे पहिले स्टोअर महाराष्ट्रातील अंबरनाथ येथे पटेल्स आर मार्ट या ब्रँड नावाने उघडण्यात आले. आता मे २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ४३ स्टोअर्स आहेत. आता कंपनीने पटेल फ्रेश, इंडियन चस्का, ब्लू नेशन आणि पटेल इसेन्शियल्स सारखी स्वतःची लेबल उत्पादने लाँच केली आहेत.
पटेल रिटेलचा २४२.७६ कोटी रुपयांचा आयपीओ १९ ते २१ ऑगस्ट दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि एकूण ९५.६९ पट सबस्क्राइब झाला, या आयपीओमध्ये २१७.२१ कोटी रुपये किमतीचे नवीन शेअर्स जारी करण्यात आले आहेत. याशिवाय ऑफर फॉर सेलमध्ये १०.०२ लाख शेअर्स विकले गेले आहेत. ऑफर फॉर सेलमधील पैसे शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना मिळाले आहेत तसेच आर्थिक वर्ष २०२३ मध्ये पटेल रिटेलचा निव्वळ नफा १६.३८ कोटी रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २२.५३ कोटी आणि आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २५.२८ कोटी रुपये झाला,
या यशामुळे अंबरनाथसह संपूर्ण ठाणे-पालघर-रायगड जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक उद्योजकाला मिळालेले हे यश इतर तरुण उद्योजकांसाठी प्रेरणा ठरले आहे.
