दु:खद_बातमी
मुंबईतून गुलाल ऊधळून येताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी गोपीनाथ सोनाजी जाधव गाव बोराळा
यांचे ट्रेनमधून पडून दुःखद निधन झाले.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी गोपीनाथ सोनाजी जाधव वय वर्ष (५५) रा.बोराळा ता.वसमत जि.हिंगोली येथील मराठा बांधव हे मुंबईमधे आले होते.परत येत असताना ट्रेन मधुन पडले होते.हाॅस्पिटलमधे ऊपचारा दरम्यान दु:खद निधन झाले आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली…
मराठा समाजाने आजवर कितीही मोठमोठे मोर्चे काढले, तरी कायदा-सुव्यवस्थेला तडा जाईल असे वर्तन कधीच केले नाही. सार्वजनिक सुव्यवस्था पूर्णपणे खंडित होईल असे क्षण आजवर निर्माण झालेले नाहीत. नुकताच मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली झालेला मराठा आरक्षणाचा मोर्चा असो किंवा यापूर्वीचा मराठा क्रांती मोर्चा – हे दोन्ही मोर्चे “आदर्श मोर्चा कसा असावा” याची उत्तम उदाहरणे ठरली.
या मोर्च्यांच्या वेळी पोलिस प्रशासनाने अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. थोडी शिथिलता नागरिकांना मिळाली, तरीही मराठी बांधवांनी इतर मुंबईकरांच्या असुविधेचा विचार करून सहकार्याची भूमिका निभावली. आंदोलनस्थळी ५००० लोकांची मर्यादा असल्याने अनेक आंदोलक सहभागी झाले होते
