अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
के.के.एम. महाविद्यालयात राधाकृष्णन जयंती उत्साहात साजरी
मानवत / प्रतिनिधी अनिल चव्हाण
भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्ताने के.के.एम. महाविद्यालय, मानवत येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती डॉ. शारदा राऊत यांनी भूषवले. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी राधाकृष्णन यांच्या विचारांचा व आदर्शांचा संदर्भ देत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जीवन घडविण्यात घ्यावयाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात प्राध्यापक गिरासे सर यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून समाजाचे भविष्य घडविणारा शिल्पकार असल्याचे सांगितले.
यावेळी प्राध्यापक गीते सर, प्राध्यापक लांडगे सर, प्राध्यापक चालिकवार सर आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी शिवानंद बोचरे, भाऊसाहेब नखाते, नितेश भिसे, अनिल पुरी, किरकिरे, पवार व संदीप काळे यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक बागुल सर यांनी मानले. शिक्षक दिनाच्या औचित्याने झालेला हा कार्यक्रम उपस्थितांना प्रेरणादायी ठरला.








