अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कै. द्वरकाबाई थेपडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न….
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे कै. द्वरकाबाई थेपडे इंग्लिश मिडीयम स्कूल म्हसावद येथे आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला . भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो . डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापिका सौ संगीता पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षक दिनानिमित्त शाळेचे सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे संभाषण केले व मुख्याध्यापिका म्हणून कुमारी सोनाक्षी विकास पाटील तसेच इतर विद्यार्थीनीं शिक्षकांचे भुमिका मांडली व सर्व विद्यार्थ्यांनी गुरू म्हणून सर्व शिकक्ष व कर्मचारी याना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमांचे आयोजन कै.द्वराकाबाई थेपडे इंग्लिश मिडीयम स्कूल शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले
