अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
विठ्ठलनगर एक मध्ये आठ ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर : जेष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस दक्षिण नागपुर येथील विठ्ठल नगर 1 येथील माहे ऑगस्ट मध्ये येणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस जेष्ठ नागरिक समिती तर्फे दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राबविल्या जाणाऱ्या सामूहिक वाढदिवस उपक्रमांतर्गत यावेळी आठ जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस शनिवारी 30 ऑगष्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांचे आयोजन सार्वजनिक हनुमान मंदिर विठ्ठल नगर येथे करण्यात आले. अध्यक्ष स्थानी प्रेमदास नंदनवार होते. प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ता प्रवीण ठाकरे होते. किशोर मेश्राम, केवलराम पटोले, प्रा. रमण सुब्रमण्यम कनुमल्ला, अरुण आसरे, प्रदीप भाग्यवंत, पुष्पाताई काळे, शालूताई बुरड़कर आणि नीलिमा पावडे मान्यवर सदस्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वस्तीतील जेष्ठ नागरिक हे प्रामुख्याने सदर कार्यक्रमात हजर होते. संचालन नरेंद्र त्रिवेदी यांनी तर आभार प्रमोद झुरमुरे यांनी मानले. अल्पोपहारा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
