अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दहिगाव खून प्रकरण : सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाईची ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे
जळगाव जिल्ह्यात यावल या तालुक्यात : दि. 29 ऑगस्ट रोजी दहिगाव गावच्या बाहेरील विरावली रस्त्यावर खारवा शिवारात घडलेल्या इमरान युनूस पटेल (वय 21) या तरुणाच्या निघृण खुनाने जिल्हा हादरून गेला आहे. या खून प्रकरणावरून समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे जळगाव जिल्हा अध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणात दोन आरोपी पोलिस कोठडीत असले तरी प्रत्यक्षात सहा ते सात जणांनी मिळून हा खून केल्याचा ठोस संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी विलंब न करता सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा. तसेच मृतक इमरान पटेल यांच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय आर्थिक मदत व संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी गुंड प्रवृत्ती व अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखावी, अशीही मागणी करण्यात आली. अन्यथा संघटनेला जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेने दिला आहे.
या वेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी : युवा तालुका अध्यक्ष जितू इंगळे, युवा उपाध्यक्ष श्रावण भालेराव, तालुका सचिव पवन गाढे, शहर अध्यक्ष आदित्य गजरे, निखिल भालेराव, लकी तानसर भारत बारेला यावल आदी मान्यवर उपस्थित होते.
