एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एरंडोलला अथर्वशिर्ष पठनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

एरंडोलला अथर्वशिर्ष पठनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

राजामाता जिजाऊ महिला मंडळ-सर्वधर्मसमभाव महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम

स्वप्नील बोरसे विशेष प्रतिनिधी

एरंडोल येथील सरस्वती कॉलनीत राजमाता जिजाऊ महिला मंडळ आणि सर्वधर्मसमभाव महिला मंडळातर्फे गणरायासमोर सामुहिक अथर्वशिर्ष पठनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. पठनानंतर उपस्थित सर्व महिलांनी आरती सादर करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शोभा जगदीश साळी यांची ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच सर्वधर्मसमभाव महिला मंडळाच्या अध्यक्षा मीना मानुधने यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्षा तथा जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला अहिरराव, सूत्रसंचलन वंदना पाटील तर आभार वैशाली पाटील यांनी केले. कार्यक्रमास जिजाऊ महिला मंडळ आणि सर्वधर्मसमभाव महिला मंडळाच्या बहुसंख्य भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकला जैन, छाया निंबाळकर, मीना चौधरी, कविता मानुधने, शकुंतला पाटील, कल्पना चौधरी, मंगला चौधरी, जयश्री वसईकर, माधुरी पाटील यांनी परिश्रम घेतले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link