बाळू मामाच्या नावानं चांगभलं
कोल्हापूर मधील सुभाषनगर बाळू मामा गल्लीचा.
प्रति बाळू मामा असणारा
नवसाला पावणारा गणपती
प्रतिनिधी लव क्षीरसागर
गणपती उत्सवाच्या निमित्त सुट्टीत कोल्हापूरला आम्ही विद्या ताई कडे गेलो असता, सकाळी घरी गेल्या नंतर भाचा ओमकार ने त्यांच्या सुभाष नगर मधील “बाळू मामा गल्ली” बद्दल माहिती देत कथा सांगितली.
त्यांच्या मंडळातील गणेश मूर्ती साधारण 2006 मध्ये विसर्जन दिवशी काही केल्या जागीच स्थिर झाली, इतर मंडळाच्या पैलवान लोकांना बोलावून देखील बिलकुल उचलता आली नाही. रोज वेग वेगळ्या लोकांनी प्रयत्न केल्या नंतर त्यांनी क्रेन ने मूर्ती हलविन्याचे प्रयत्न करून ही
जागची हलत नाही. हे पाहून कुणा भटजीने त्यांना बाळू मामा च्या मंदिरात जाऊन त्यांची काठी, घोंगडी आणून पूजन करून मूर्तीवर ठेवण्यात आली. तेव्हा ती मूर्ती उचलण्यात आली.
हा संत बाळूमामा चा चमत्कार हाहा म्हणता संपूर्ण कोल्हापूरात वाऱ्या सारखा पसरला आणि लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाला रांगा लावल्या होत्या.
आजही या मंडळाची प्रति बाळूमामा गणपती मूर्ती असते आणि बरेच भक्त नवस ही करतात…
आम्हाला सकाळी ऐकून पाहण्याची इच्छा होती, ती दुपारी आम्ही मार्केटला सहज फेरफटका मारायला गेलो आणि रस्ता चुकलो, तेव्हा एका रिक्षावाल्याने एका मंडपा अलीकडे सोडले. जेव्हा थोडं पुढे गेलो तेव्हा समजलं कीं आपणांस ” बाळू मामा नेच दर्शना ला बोलवलं..
खरंच चमत्कार होता, आमच्या साठी.
प्रति बाळूमामा मूर्ती चें दर्शन घेऊन अतिशय प्रसन्न वाटले.
कोल्हापूर मधील सुभाष नगर विभाग
नवसाला पावणाऱ्या गणपतीची
“बाळू मामा गल्ली ” म्हणून प्रसिद्ध झाली आहे..
संत बाळू मामा गणपती बाप्पा,
सर्वांनां सुखी, समृद्धी, आनंदी ठेवून,
चांगली कर्म करण्याची बुद्धी दे..
गणपती बाप्पा मोरया
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
#ganeshotsav
