अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पदोन्नतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी नियुक्ती; जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहणार; नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिंसे..!!
संगिता इंनकर सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नवनियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिंसे यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार मावळते जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या… की सिंधुदुर्ग जिल्हा मला मिळाला खूप जिल्हा छान आहे. या जिल्ह्यात मी प्रथमच जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील, राहणार तसेच प्रलंबित विकास कामांना चांगलीच गती देणार आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुखे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपजिल्हाधिकारी शारदा पोवरा आरती देसाई जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तहसीलदार विरसिंग वसावे चैताली सावंत तसेच महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांशी नूतन जिल्हाधिकारी धोडमिंसे यांनी औपचारिक ओळख करून घेत संवाद साधला. धोडमिंसे या यापूर्वी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. 22 जुलै ते 2023 पासून 26 महिने या पदावर त्यांनी काम पाहिले आहे. प्रशासकीय शिस्तीसाठी त्यांनी अनेक महत्त्वांचे निर्णय घेतले, माझा गावाचा धडा, हा अभिनव उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये गावचा अभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला. सांगली जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी पदाचा पदभार घेतल्यापासून अनेक उपक्रम त्यांच्या कार्यकाळात राबविल्याने सांगली जिल्हा परिषद प्रथम क्रमांक त्यांनी मिळवून दिला होता. तृप्ती धोडमिंसे नेहमीच प्रयत्नशील राहिल्या. ( सांगलीचे सीईओ उद्याचे जिल्हाधिकारी ) सांगलीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले अधिकारी पुढे जिल्हाधिकारी होतात ही गेल्या अनेक वर्षाची परंपरा बनली आहे. डॉ. राजेंद्र भोसले बदलीनंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी झाले, अभिजीत राऊत जळगांवला तर जितेंद्र डुडी साताऱ्याला जिल्हाधिकारी म्हणून गेली सध्या त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारी आहे. आणि आता तृप्ती धोडमिंसे सिंधुदुर्गला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी ठरल्या आहेत*
