अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शिवसेना उरण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले उरणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
प्रतिनिधी मुकूंद मोरे रायगड जिल्हा
रायगड जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती
शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उरण यांच्या वतीने बुधवार दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण शहर शाखेजवळ अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई व जयश्री फाउंडेशन यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबीराचेव आयोजन करण्यात आले होते, या शिबिरामध्ये बी.पी चेक, शुगर चेक , वजन चेक, रक्तदाब तपासणी, शरीर द्रव्य निर्देशांक (BMI), हाड घनता तपासणी, तसेच सर्व रुग्णांना शिबिरात तज्ञ् डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला, या शिबिरामध्ये 130 उरणकर नागरिकांनी याचा लाभ घेतला, या शिबिराचा आयोजन केल्याबद्दल उरणकर नागरिकांनी श्री गणेशोत्सव मंडळाचे व शिवसेनेचे आभार मानले आहेत.
या शिबिरास रायगड जिल्हाप्रमुख आमदार श्री मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख श्री नरेश रहाळकर, मा नगराध्यक्ष श्री गणेश शिंदे, उरण शहर संपर्कप्रमुख श्री गणेश म्हात्रे, शहर संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, मा शहर संघटक श्री प्रवीण मुकादम, शाखाप्रमुख श्री अविनाश म्हात्रे शिवा म्हात्रे व कार्यकर्ते उपस्थित होते सदर आरोग्य शिबीराच्या आयोजन शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संदेश पाटील सुशांत तांडेल संजय मेश्राम फतेह खान व कार्यकर्ते यांनी केले होते
