अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील, राहणार विशाल नरवाडे यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला..!!
संगीता इंनकर सांगली जिल्हा प्रतिनिधी
सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिंसे यांची पदोन्नतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. आता त्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर त्यांच्या रिक्त जागेवर नव्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विशाल जी. नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनीही आपला पदभार स्वीकारला आहे. विशाल नरवाडे यांनी यापूर्वी बुलढाणा व धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तर सांगली ते सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणूनही कार्यरत होते. आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्पांचे प्रकल्पाधिकारी म्हणूनही काम पाहिले होते. यावेळी उत्कृंष्ट निवडणूक नोंदणी अधिकारी सन 2024 मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला होता. दिल्लीत ग्रामीण विकास मंत्रालयात सहाय्यक सचिव म्हणूनही काही काळ काम केले होते. विशाल नरवाडे हे मूळचे बुलढाणाचे रहिवासी आहेत. त्यांनी आयपीएस परीक्षेत यश मिळवले होते. 2016 ते 2020 या काळात भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणूनही काम केले मात्र त्यानंतर प्रशासकीय सेवेकडे वळले, तर तृप्ती धोडमिंसे या 22 जुलै ते 2023 पासून सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आपल्या पदावर नेहमीच प्रयत्नशील, राहिल्या आता त्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
