अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मानोली येथे स्व. शरद जोशी यांची जयंती साजरी
मानवत प्रतिनिधी अनिल चव्हाण
मानवत तालुक्यातील मानोली येथे शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशी यांची 90 वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी गावातील तरुण वृद्ध शेतकरी यांनी यावेळी जयंती मध्ये सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमात अधूनिक तंत्रज्ञान या विषयावर चर्चा करण्यात आली. कमी खर्चात शेती कशी करायची अधूनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि शेतीचे उत्पादन कसे वाढेल या अनेक मुद्यावर सर्व मानोली गावातील शेतकरी व नागरिकांनी या विषयावर चर्चा केली व नंतर स्व. शरद जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पंडितराव शिंदे. रामभाऊ शिंदे गणेश घाडगे. प्रल्हाद शिंदे. ज्ञानोबा मांडे. भारत निर्मळ. रुस्तुम मांडे. सर्जेराव मांडे. लक्ष्मण शिंदे. भागवत शिंदे. अवधूत शिंदे. कृष्णा शिंदे. उद्धव सुरवसे. दत्ता मांडे प्रभू घाडगे. सुदामराव शिंदे. भागवत शिंदे. व यावेळी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते.
