अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वसंतनगर तांडा येथे श्री रामदेव बाबा जन्मौत्सव व भंडारा मोठ्या उत्साहात साजरा
पारोळा तालुक्यातील वसंतराव नाईक यांच्या नावाने ओळखला जाणारा तांडा वसंतनगर येथे सालाबादप्रमाणे यंदाही दशमी च्या दिवशी श्री रामदेव बाबा प्रकट दिवसानिमित्त गावातील ५ घर गल्ली रामदेव बाबा भक्त परिवारातर्फे भंडाऱ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले, यावेळी गावातील लोकांनी लोकवर्गणीतून भव्य दिव्य असा भंडारा मोठ्या उत्साव साजरा केला.
सविस्तर माहिती अशी की, वसंतनगर तांडा येथे दरवर्षी श्री. रामदेव बाबा रुणिछा धाम ( राजस्थान ) यांचा जन्म उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो, भाद्रपद दशमीला श्री रामदेव बाबा प्रकट झाले होते. म्हणून श्री क्षेत्र रामदेवरा राजस्थान येथे मेळा भरतो. याच दिवसाचे औचित्य साधून काल दि. २ सप्टेंबर रोजी वसंतनगर तांडा येथील ५ घर येथे रामदेव बाबा भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व प्रथम रामदेव बाबा मंदीर कळस पुजन व झेंडा चढविण्यात आले, तद्नंतर रामदेव बाबा भक्त परिवारातर्फे भोग नैवेद्य बाबांना अर्पण करून उपस्थित भक्तांना प्रसाद देऊन महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली, यावेळी संपूर्ण वसंतनगर गावातील लोक तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांनी व महिलांनी महाप्रसादाचा आनंद घेतला कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ५ घर गल्लीतील नागरिक व महिलांनी विशेष सहकार्य केले, तसेच रमेश जाधव, शाम जाधव, विनोद जाधव, विक्रम जाधव, सुदाम जाधव, सचिन जाधव, विठ्ठल जाधव, ईश्वर जाधव, मनोहर पवार, रंगलाल जाधव, सत्यनारायण, कृष्णा जाधव, आकाश जाधव, अनिल जाधव, राकेश जाधव, डॉ. राम जाधव, इंदल जाधव, विष्णू जाधव, विजय जाधव, पिंटू जाधव, धारा जाधव, सुनील जाधव, मनोज जाधव, आप्पा पवार, जसपाल जाधव, भास्कर जाधव, कमळ जाधव, तुकाराम जाधव, संजय जाधव, कालिदास जाधव, दिलीप जाधव, कैलास जाधव, तसेच पत्रकार अरविंद जाधव सह लहान मोठ्या तरुणांनी सदर भंडारा मोठ्या उत्साहात यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी माजी पारोळा पंचायत समितीचे सभापती भाऊसो. प्रकाश देशमुख जाधव व गल्लीतील तसेच गावातील सर्वच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी व उपस्थित होते.
