अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
सोबतच शिवसेना (उबाठा) व काँग्रेस पक्षातील पदाधिकारी भाजपात
रवींद्र शिंदे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश
महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.2:-भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांनी भारतीय जनता पक्षात आज (दि.२) ला प्रवेश घेतला.
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांनी मिळून काही दिवसांअगोदर तत्कालीन सभापती भास्कर ताजने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणून पदावरून पायउतार केले होते. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत हालचाली सुरु होत्या. रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर सर्वांचा विश्वास आहे. त्यानुसार सर्वांनी प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात बहुमतात विजयी झाली होती. या बाजारसमितीवर रवींद्र शिंदे यांचे मार्गदर्शन व नेतृत्व आहे. त्यानुसार रवींद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समितीच्या संचालकांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश केला. सोबतच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी देखील भाजपात प्रवेश घेतला.
यावेळी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या उपसभापती अश्लेषाताई मंगेश भोयर, संचालक गजानन उताणे, ज्ञानेश्वर डुकरे, मनोहर आगलावे, शामदेव कापटे, परमेश्वर ताजणे, शांताताई रासेकर, शरद जांभुळकर, कान्होबा तिखट, मोहन भुक्या सोबतच काँग्रेस पक्षाचे संचालक राजेन्द्र डोंगे, अनिल चौधरी, राजु आसुटकर यांनी पक्ष प्रवेश केला. सोबतच उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था भद्रावतीचे अध्यक्ष रोहण कुटेमाटे, उपाध्यक्ष विश्वास कोंगरे, अरुण घुगुल, सतिश वरखडे, पवन नगराळे सोबतच भद्रावती रहीवाशी आनंद तागडे, हरी रोडे, संतोष माडेकर, मारोती नागपूरे यांनी पक्षात प्रवेश घेतला.
यांच्यासह शिवसेना (उबाठा) महीला आघाडीच्या माजी तालुका प्रमुख आशा ताजणे, शिला आगलावे, वर्षा आत्राम यांनी पक्षात प्रवेश घेतला.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी सर्वांचे रीतसर भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन घेतले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, तालुका अध्यक्ष शामसुंदर उरकुडे, शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, विनोद पांढरे, रमेश राजूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेव ठाकरे आदी उपस्थित होते.
