अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सगरोळी येथे.नवनाथ पोथी समाप्ती निमित्त,श्री केदारेश्वर महादेव मंदिर येथे महाप्रसादेचे आयोजन
मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड
नांदेड :आज दी.4/9/2025 रोजी सगरोळी येथे.नवनाथ पोथी समाप्ती निमित्त,श्री केदारेश्वर महादेव मंदिर येथे.महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले नांदेड जिल्ह्यातील, बिलोली तालुक्यात.मोठी ग्रामपंचायत व मोठे बाजारपेठ,असलेली. सगरोळी या गावात,भव्य, दिव्य,श्री केदारेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन, जानेवारीमध्ये, कलशरोहन,कार्यक्रम झाला आहे. नवसाला पावणारा महादेव मंदिर अशी ओळख,झाल्यामुळे या ठिकाणी दर, सोमवारी नित्य नियमाने,प्रति एक व्यक्तीची अभिषेक होत असते, तसेच दर सोमवारी,श्री केदारेश्वर भजनी मंडळाकडून, दर सोमवारी सकाळी शिवपाठ,व सायंकाळी भजनाचे कार्यक्रम घेतले जाते,तसेच श्रावण महिन्यात 40 दिवस,नवनाथच पोथीचे आयोजन करण्यात आले,या पोथीचे, वाचन श्री शंकराप्पा महाराज उदगीरे,यांच्या अमृतवाणीतून होत आहे. श्रावण महिन्याच्या, 4 सोमवारी संजय पाटील चिंलनोड, रमेश मनशेतवार, राजू लिंग बाबू सावकार गादेवार,मारोती पाटील कुरोटगे, यांच्याकडून 4 सोमवारी अन्नदान,करण्यात आले आहे. तसेच दिनांक आज 4/9/2025 रोजी गुरुवारी,नवनाथ पोथीची समाप्ती, श्री 108 शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर,व श्री 108 वीरूपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, यांच्या उपस्थितीत, सांगता होणार आहे.या शेवटच्या,दिवशीचे महाप्रसादाचे अन्नदाते, मंगलपवार विठ्ठल मोहनाजी, यांच्याकडून आहे.तरी पंचक्रोशीतील,समस्त महादेव भक्तांनी,पोथी समाप्तीला उपस्थित रहावे.असे आव्हान श्री केदारेश्वर महादेव मंदिर समिती,व समस्त गावकरी मंडळी, सगरोळी यांच्याकडून करण्यात आले आहे, व तसेच गुरुवारी सायंकाळी ठीक 8 वाजता, भजनी मंडळाकडून शिव जागरण ठेवण्यात आले, असल्यामुळे,पंचकोशीतील भजनी, मंडळांनीही उपस्थिती राहून.या कार्यक्रमाची शोभा वाढावी असे, आव्हान,केदारेश्वर महादेव मंदिर, समितीकडून करण्यात आली आहे.
