अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
लेखक सुभाष सोनकांबळे यांच्या आय म्या पंतप्रधान पाह्यला” या पुस्तकाचे प्रकाशन लंडन मध्ये होणार
जळगाव जिल्हा ब्युरो चिफ हमीद तडवी
महाराष्ट्राचे भूमिपुत्र लेखक सुभाष सोनकांबळे यांनी लिहिलेल्या बहुचर्चित ‘आय म्या पंतप्रधान पाह्यला’ या पुस्तकाचे प्रकाशन जगातील शंभर देशांत होणार असून पहिले प्रकाशन सोनकांबळे थेट लंडन येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक स्थळी करणार आहेत. या पुस्तकात लेखक सोनकांबळे यांनी भारताने पाकिस्तानवर मिळवलेला विजय तसेच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याची विजयी गाथा जगासमोर मांडली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारतच नव्हे तर संपूर्ण जगाच्या प्रगतीला किती घातक आहे, पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा करण्याचं तसेच यापूर्वी पाकिस्तानने भारतावर छुपे युद्ध लादत 20/11 ला वेठीस धरले होते. मुंबईवर भ्याड हल्ला करून शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. त्यावेळी पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाब याला मुंबई पोलिसांनी जीवंत पकडले होते. भारताची वाढती आर्थिक आणि सामाजिक प्रगती रोखू पाहणाऱ्या या भ्याड हल्ल्यावरही लेखक सोनकांबळे यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे. ‘आय म्या पंतप्रधान पाह्यला’ हे लेखक सोनकांबळे यांचे ज्वलंत आत्मकथन आहे. त्यात जगातील संपूर्ण दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत कसा विश्वगुरु ठरेल. याचे विचार मांडण्यात आले आहे.
26/11 चा मुंबईवरील दहातवादी हल्ला आणि आताचा पहेलगामवरील हल्ल्याचे जळजळीत वास्तव आणि अशा भारतात घडणाऱ्या घटना जगातील सामान्य लोकांना दहशतवादाविरोधात विचार करायला आणि त्याविरोधात लढ्यात स्वयंप्रेरणेने सहभागी व्हायला, सांगणारे विचार आहेत. दरम्यान, दहशतवादी अड्डा असलेला पाकिस्तान भारत व जगाची प्रगती रोखण्यासाठी कोणत्या खालच्या थराला जावू शकतो, याचे चित्रही लेखक सोनकांबळे यांनी आपल्या ‘आय म्या पंतप्रधान पाह्यला’ या पुस्तकात आपल्या लेखणीच्या शैलीत रेखाटले आहे.
