अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जी – पॅट व गेट राष्ट्रीय परीक्षेत यश
शहादा (प्रतिनिधी) :
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (एनबीईएमएस) मार्फ़त घेण्यात आलेल्या जी – पॅट 2025 (ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट) व इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी मार्फ़त घेण्यात आलेल्या गेट – 2025 (ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश संपादन केले.
दरवर्षी जी – पॅट व गेट परीक्षा संपूर्ण देशातून बी. फार्मसी पदवीधारक किंवा पदवीच्या अंतिम वर्षांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच एम. फार्मसी पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेच्या स्वरूपात राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जाते. त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील दोन विद्यार्थी जी – पॅट 2025 व एक विद्यार्थी गेट – 2025 या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यात जी – पॅट परीक्षेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी हिमांशू राजेंद्र निकम (175 गुण), सविता बापू भिल (99 गुण) तसेच गेट – 2025 परीक्षेमध्ये लाईफ सायन्स शाखेतून सुयोग पांडुरंग चव्हाण (32.67) गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
जी – पॅट व गेट – 2025 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी दरमहा 12 हजार 400 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते त्यासाठी महाविद्यालयातील तीन विद्यार्थी पात्र झाले आहेत. विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सातत्याने महाविद्यालयातर्फे प्रयत्न केले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर, विशेष मार्गदर्शन सत्र, अभ्यास वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. जी – पॅट 2025 व गेट – 2025 परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांना दिले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्रा.डॉ.जवेश पाटील, प्रा.सैय्यद हमीद हसनी, प्रा.डॉ.सौ.सुनिला पाटील, प्रा.सौ.सुलभा महाजन, प्रा.योगेश रोकडे, प्रा.अमित धनकानी, प्रा.सौ.अमृता पाटील, प्रा.आकाश जैन, प्रा.सौ.मानसी धनकानी, प्रा.हितेंद्र चौधरी, प्रा.दिवाकर पाटील, प्रा.आझम शेख, प्रा.समीर शेख, प्रा.रोशन चौधरी, प्रा.डॉ.राहुल लोव्हारे, प्रा.सौ.मृणाल पेंढारकर, प्रा.सौ. नेहा पाटील, प्रा.कृतज्ञा पाटील व कर्मचारी वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. जी- पॅट व गेट राष्ट्रीय परीक्षेसाठी जी- पॅट व गेट परीक्षा प्रमुख प्रा.योगेश रोकडे यांनी परिश्रम घेतले.
