अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सोलापूर ग्रामीण पोलीस नेहमीच प्रयत्नशील,
दरोड्यातील सर्वच गुन्हे आणले उघडकीस
अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर..!!
संगिता इंनकर सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीण विभागातील सर्वच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच संपूर्ण ग्रामीण सोलापूर ग्रामीण पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील दिसून येते. सोलापूर ग्रामीणच्या विभागातील गुन्ह्यांमध्ये पुण्यानंतर सोलापूरचा नंबर चांगलाच लागला असला तरी सोलापूर ग्रामीण पोलीस हे नेहमीच प्रयत्नशील आहे. दरोड्यासारखे सर्वच गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यातील 76% गुन्हे उघड करून त्यातील 80 टक्के मालमत्ता ही रिकव्हर करण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी छोट्या-मोठ्या आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहोत. त्यांच्याकडून शांतता ठेवण्याचा ब्रांड लिहून घेत आहोत. त्यांनी पुन्हा जर गोंधळ घातला तर त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम भरून त्यांच्यावर कारवाई करीत करणार आहोत. त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. मागील वर्षाच्या तुलनेत गांजा, मेफेड्रिनच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी विशेष ड्राईव्ह नुकतेच घेण्यात आले आहे. एका महिन्यांच्या ड्राईव्ह मध्ये 54 केसेस करण्यात आल्या होत्या यापुढेही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली आहे. शिवाय सोलापूरच्या सीमेलगत असलेल्या राज्यांशी वेळोवेळी बॉर्डर मिटींगही होते. यात आरोपींची आणि गुन्ह्यांची माहिती आम्ही एकमेकांना अदान प्रदान करतो. यामुळे आरोपींवर वचक बसत असून गुन्ह्यात घट होत असल्याची माहितीही यावलकरांनी दिली आहे.
