अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मद्यपींच्या हितासाठी मद्य धोरणाची गरज: ॲड. सुरेशचंद्र घाटे
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
शासनाद्वारे जिल्हास्तरावर तीन सदस्यीय कमिटी तयार करावी
नागपूर: मद्य पिणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी अशी की, त्यांच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत व्हावी. यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन जन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पॅंथर लॉग मार्च नेते व निवृत्त न्यायाधीश ॲड. सुरेशचंद्र घाटे यांनी मागणी केली की, मद्यपींनच्या कुटुंबीयांना लाडक्या बहिणी प्रमाणेच आर्थिक मदत करावी. अशी मागणी सरकारला केली आहे. ॲड. सुरेशचंद्र घाटे म्हणाले की, उत्पादन शुल्क विभागाला मद्यपींनापासून आर्थिक लाभ होतो. दारू विक्री करणारे दुकानदार व बारमालकांनी मद्यपी नाऱ्यांचा डाटा गोळा करून तो जी कमिटी राहील त्या कमिटी समोर सादर करणार. जेणेकरून मद्यपींच्या कुटुंबाला शासनातर्फे आर्थिक सहाय्य होईल. निवृत्त न्यायाधीश ॲड. घाटे पुढे म्हणाले की, मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीला अति सेवन झाल्यास बारमालकाने त्याला सन्मान जनक वागणूक द्यावी. दारू भट्टीवर संपूर्ण असावी. अधिक दारूचे सेवन झाल्यास त्या मद्यपींकाला बारमालकाने किंवा कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे घरी सोडण्याची व्यवस्था करावी.
महाराष्ट्र सरकारने जिल्हास्तरावरील तीन सदस्य कमिटी तयार करावी व या कमिटीवर सुशिक्षित मद्यपीची नियुक्ती करावी.
जर मद्यपींचा आकस्मित मृत्यू झाल्यास शासनाच्या मार्फत त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची आर्थिक मदत करावी. अशा एकूण तेरा मागण्याचे पत्र राष्ट्रीय रिपब्लिकन जन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशचंद्र घाटे यांनी तयार केले असून ते नागपूर जिल्हाधिकारी मार्फत ते शासनाकडे सादर करणार आहे. असही घाटे यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत घाटे यांचे सेवक राजेश पाटील उपस्थित होते.
👆🏾
