अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
गणेश उत्सवानिमित्त आंध्र झार आळी तरुण मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,
सालाबाद प्रमाणे यावर्षी गणेशोत्सवानिमित्त संयुक्त आंध्र झार आळी तरुण मंडळातर्फे मंडळाच्या आवारामध्ये दिनांक 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, यामध्ये जादूगर हास्य विनोद कार्यक्रम, स्त्रियांसाठी पाकाला स्पर्धा, लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा भरतनाट्यम, होम मिनिस्टर कार्यक्रम, सत्संग आर्ट ऑफ लिविंग टीम, कल्पवृक्ष महिला भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा गाण्याचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार आहे,
अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष महेश चक्राल, उपाध्यक्ष रोहित बंडी, श्रीकांत येमुल, कार्याध्यक्ष किशोर वन्नम, सागर उरडी, खजिनदार सुरज कोंडा अक्षय सामल, सेक्रेटरी ओम कार पद्मा, विकी दंडी, संजीत कामुनी, यांनी दिली,
