अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मानवत मध्ये मराठे उद्या मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात मुंडन आंदोलन करणार
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात होणार्या मूंडण आंदोलन उपस्थित राहण्याचे सकल मराठा समाजाचे आवाहन
मानवत / बातमीदार
सकल मरठा समाज बांधवाना ओबीसीतुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मानवत मध्ये मंगळवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की,
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना सर सकट ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे म्हणून मुंबई येथे २९ ऑगस्ट पासुन आझाद मैदानात आमरण उपोषणास बसलेले आहेत.
या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. परंतु अद्यापही आरक्षण संदर्भात सरकारने कुठला ही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ह्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मंगळवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मानवत शहरात मुंडण आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले असून शासनाने ह्या आंदोलनाची दखल घ्यावी व आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास ह्यची जवाबदारी सर्वस्वी राज्य व केंद्रातील भाजपा शासनावर राहील असे देखील सकल मराठा समाजाच्या वतीने मत व्यक्त करण्यात आले.
