एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

संत रामपाल जी महाराजांचा संदेश

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

संत रामपाल जी महाराजांचा संदेश – “परमात्मा प्राप्तीसाठी आहे, देहत्यागासाठी नाही”

प्रतिनिधी सतीश कडू 

संत रामपाल जी महाराज यांच्या सत्संगामध्ये मनुष्य जन्माचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले जाते. ते सांगतात की हा जन्म फक्त परमात्मा प्राप्तीसाठी आहे, आपल्या प्रवचनांमध्ये ते कबीर परमात्म्यांच्या वचनांचा उल्लेख करत सांगतात – *“मनुष्य जन्म दुर्लभ है, मिले ना बारंबार। जैसे तरुवर से पत्ता टूट गिरे, बहुर ना लागे डार।”* यावरून स्पष्ट होते की एकदा मनुष्य जन्म गमावला, तर पुन्हा मिळणे कठीण आहे.

संत रामपाल जी महाराज यांनी आत्महत्या, नैराश्य आणि चुकीच्या विचारांबद्दल देखील आपल्या प्रवचनांमध्ये मार्गदर्शन केले आहे. अलीकडेच ट्विटरवर #खुदकुशी\_समस्या\_का\_समाधान\_नही हा हॅशटॅग देशभरात ट्रेंड झाला. या हॅशटॅगमधून लाखो लोकांनी आत्महत्या न करण्याचा आणि संत रामपाल जी महाराजांनी दाखवलेल्या अध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला.

मात्र, याच दरम्यान 25 ऑगस्ट रोजी अनेक नामांकित दैनिकाने न्यूज पेपर कुठलीही शहनिशा न करता चुकीची बातमी प्रकाशित केली की, *“म्हणे, परमेश्र्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबर रोजी देहत्याग करणार”* ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे अनुयायांनी स्पष्ट केले आहे.
*कर्नाटक सीमेवरील अनंतपूर गावात शिंगणापूर रस्त्यावर राहणारे तुकाराम इरकर यांच्या कुटुंबातील ५ सदस्यांनी* असे विधान केल्याचे सांगितले गेले की – *“आम्ही संत रामपाल महाराजांकडून दीक्षा घेतली असून आता आयुष्याची इतिकर्तव्यता झाली आहे. ८ सप्टेंबर रोजी परमेश्वराचे बोलावणे आले असून, ६ तारखेला महापूजा सुरू करून ८ सप्टेंबर रोजी देहासह वैकुंठी जाणार आहोत.”*

या बातम्यांशी आमचा कोणताही संबंध नाही.
या सर्व बातम्या काही दुरभिसंधी व स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांनी जाणूनबुजून पसरवल्या आहेत. अशी कोणतीही घटना प्रत्यक्षात घडलेली नाही. असे इरकर परिवाराने सांगितले आहे. आणि त्यांचा परिवाराकडून जबाबनामा व प्रेसनोट गावं अनंतपूर तालुका अथणी (कर्नाटक) येथे देण्यात आला आहे. व संत रामपाल जी महाराज यांच्या शिष्यांकडून अनंतपूर पुलिस स्टेशन येथे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. आणि ज्या कोण्या व्यक्ती नी ही चुकीची बातमी पसरवली आहे. त्या व्यक्ती वर कडकडीत कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अनंतपूर पुलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे.

संत रामपाल जी महाराजांनी कधीही आपल्या प्रवचनात किंवा लिखाणात पाखंडवाद व अंधश्रद्धा, आत्महत्या करणे अशा प्रकारचे विधान केलेले नाही. याबाबत त्यांचे शिष्य म्हणाले की, ही एक खोटी अफवा असून, अशा चुकीच्या बातम्यांमुळे समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो.

संत रामपाल जी महाराज यांचे अधिकृत यूट्यूब चॅनलवर उपलब्ध प्रवचनांमध्येही त्यांनी स्पष्टपणे केवळ अध्यात्मिक ज्ञान, परमात्म्याची भक्ति आणि योग्य जीवन जगण्याबद्दल मार्गदर्शन केले आहे. ८ सप्टेंबरला देहत्याग करण्याचा कोणताही उल्लेख त्यांच्या प्रवचनात नाही.

संत रामपाल जी महाराज यांचे प्रवचन केवळ धार्मिक नाहीत तर सामाजिक संदेश देणारेही आहेत. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही, असे ते सांगतात. त्यांच्या मते आत्महत्या करणारा व्यक्ती आपले अमूल्य मानव जीवन वाया घालवतो, जे पुन्हा मिळणे कठीण आहे. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आणि सत्य साधना करूनच जीवनातील दुःखांचे समाधान मिळू शकते.

या प्रकरणातून स्पष्ट होते की काही माध्यमे योग्य पडताळणी न करता अफवा पसरवतात. भक्तगणांनी आवाहन केले की लोकांनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि थेट संत रामपाल जी महाराज यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स किंवा यूट्यूब चॅनलवरूनच माहिती घ्यावी.

निष्कर्ष :
संत रामपाल जी महाराज यांनी कधीही देहत्यागाबद्दल भाष्य केलेले नाही. उलट ते मानव जीवनाचे महत्त्व अधोरेखित करून लोकांना आत्महत्या न करता परमात्म्याचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करतात. चुकीच्या अफवांना बळी न पडता सत्य जाणून घेणे हाच आजच्या समाजाला दिलेला महत्त्वाचा संदेश आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link