अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
हजारो हेक्टर क्षेत्रावर पुरपरीस्थिती सदृश बरैच गावातील संपर्क तुटला फोनचे नेटवर्क बंद वीज पुरवठा ही खंडित
तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
गोदावरी नदीवर पोचमपाहाड बॅकवॉटरने नदी नाले ओढे ओहोळ पाण्याचा वेग वाढल्याने धर्माबाद तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर पुरपरीस्थिती सदृश बरैच गावातील संपर्क तुटला फोनचे नेटवर्क बंद वीज पुरवठा ही खंडित
धर्माबाद : तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता नाशिक वरून येणारी गोदावरी लातूर वरून येणारी वांजरा आणि तेलंगानातून हरिद्रा नदी संगम हे धर्माबाद तालुक्यात होतो म्हणून पाण्याचा विसर्ग खूप मोठा होतो पुढे जाऊन पोचमपाड श्रीराम सागर डॅम धरण येथे मिसळतो पण श्रीराम सागराचा फुगवटा महाराष्ट्रात प्रथम धर्माबाद तालुक्यात फटका बसत आहे गोदावरी नदीच्या प्रवाहात नदी नाले ओढे ओहोळ पाण्याचा वेगवान अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे जनावरांचे, पीकांचे, घरे व मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. व बऱ्याच गावचे संपर्क तुटले आणि विद्युत पुरवठा खंडित झाला, चे नेटवर्क कनेक्शन खंडित करण्यात आला आज पर्यंतही तसाच आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. संतप्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने धर्माबाद शहरातील पानसरे चौकात लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ ‘भीक मागो’ आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला.
आंदोलनात शेतकऱ्यांनी हातात वाट्या घेऊन “तीन खासदार, एक आमदार, एक मंत्री कोणीच धर्माबादकडे फिरकले नाही”, अशा घोषणा देत निषेध केला. सरकारकडून आणि लोकप्रतिनिधींनी वेळेवर मदतीचे कोणतेही ठोस पाऊल उचललेले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी ‘आम्ही भीक मागून जगायचं का?’ असा सवाल उपस्थित करत सरकारची आणि लोकप्रतिनिधींची झोप मोडण्याचा प्रयत्न केला.
मदतीचे तर कुठलेच आश्वासन नाही पण भेट देवून धिर देण्याचेही काम लोकप्रतिनिधींनी केले नाही. विशेषतः मतदारसंघात महापुराने थैमान घातलेले आ. राजेश पवार विदेशात मौजमजा करत आहेत. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करतात येत आहे. असंवेदनशील लोकप्रतिनिधीच्या निषेधार्थ पुरग्रस्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनामुळे शहरात मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. शेतकऱ्यांची मागणी आहे की, तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी व या भागाला तातडीने मदतीचा दर्जा द्यावा.
तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
