अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राष्ट्रीय क्रीडा दिना निमीत्त आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडुंचा सत्कार सोहळा संपन्न.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
खासदार क्रीडा महोत्सव आयोजन :खा. संजय जाधव.
परभणी : युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रायल भारत सरकार, क्रीडा व युवक सेवा संचालना लय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्या लय, परभणी यांच्या वतीने मेजर ध्यानचंद (हॉकीचे खेळाडू) यांचा दि. 29 ऑगस्ट हा जन्मदिन व राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या वतीने सन 2024-25 व 2025-26 या वर्षामध्ये ज्यां खेळाडुंनी शालेय क्रीडा स्पर्धा / मान्यता प्राप्त संघटनेच्या क्रीडा स्पर्धा / अखील भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये आंतर राष्ट्रीय/राष्ट्रीय पातळीवर पदक मिळविले आहे अशा खेळाडुंचा सत्कार मा. खा. संजय जाधव परभणी यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल) येथे दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 01.00 वाजता करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संजय मुंढे राज्य क्रीडा मार्गदर्शक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन राज्य सरचिटणीस टेनिस व्हॉलीबॉल गणेश माळवे, राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक धनंजय बनसोडे, प्रदिप लटपटे, चेतन मुक्तावार, तालुका क्रीडा संयोजक किशन भिसे, विलास राठोड, यांच्या उपस्थीत आंतर राष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडुचा सत्कार करण्यात आला.खा. संजय जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आर्थिक दृष्ट्या गरीब खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये काही अडचण आल्यास आर्थिक मदत करणार तसेच परभणी येथे लवकरच भव्य स्वरुपात परभणी खासदार क्रीडा महोत्सावाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच परभणीतील कोणत्याही खेळाडुंना काहीही अडचण निर्माण झाल्यास मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे. परभणीला जागतिकस्तरावर नावलौकीक करण्याकरीता जे काही प्रयत्न करता येतील त्याकरीता खेळाडु व त्यांच्या मार्गदर्शकांच्या पाठीशी उभा आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किशोर ढोके, प्रास्ताविक कल्याण पोले, आभार प्रदर्शन सुयश नाटकर तर अध्यक्षीय समारोप श्री संजय मुंढे यांनी केले.आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडुंची यादी – रमन सिंगीतम, शेख जुनेद, गायत्री वाघ, पल्लवी पितळे, नितीन खटिंग, ओंकार बाराहाते, गजानन बालटकर, ज्ञानेश्वर कावळे, अनिकेत चिद्रवार, यश चव्हाण, प्रदीप जाधव, पायल आडे, जीवन जाधव, गोविंद जाधव, आराधना ताटे, गौरी शिंदे, शामबाला नांदखेडकर, वैभव खुणे, वैभव रोडगे, अदिबा रोडगे, दिव्या एन्डायत, जितेश भिसे, मानसी कुलकर्णी, संभाजी देशमुख, दिव्या आव्हाड, अदित्य खळीकर, आरती चव्हाण, विठ्ठल बोरसे, कृष्णा डोल्हारकर, श्रेया डोल्हारकर, कैलास जाधव, मोनाली धनगर, रुखय्या शेख, सिध्दी कांबळे, तनिष्का डापकर, राजश्री सहजराव, श्रवणी पुंडगे, पुनम गोधम, अभिमन्यु कोटकवार, सायमा सय्यद, तेजश्री नागुला, पार्थ शिंदे, प्रज्वल अंभोरे, प्रेम कटारे, हर्षद जाठोडे, प्रथमेश कटारे, अमर काळदाते, प्रज्ञेश बाचावार, हिमांशु अंभोरे, योगेश्वरी पारधे, अनिल शिंदगे, श्रीसाई बोराडे, दिग्वीजय पाते इ. खेळाडुचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना बॅग, पुष्पगुच्छ देवुन यांचा सत्कार मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, मुख्य लिपीक रमेश खुणे, धिरज नाईकवाडे, प्रकाश पंडित, योगेश आदमे, भागवत दुधारे यांनी परिश्रम घेतले.
