अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
साने गुरुजी वाचनालयाचा पुस्तक पेटी उपक्रम
मानवत प्रतिनिधी अनिल चव्हाण
—————————————
मानवत येथील साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने पुस्तक पेटी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
आज रविवार, दि. 31 रोजी सेलू येथील प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमास सुरेंद्र तोष्णीवाल, लालाजी पावडे, पांडुरंग मगर, ह. भ. प.भगवान महाराज गजमल, वाचनालयाचे विश्वस्त संजय लड्डा, अशोक चिंदुरवार यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी दत्तराव कापसे, यशराज तांबे यांना या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
मानवत तालुक्यातील मूळ रहिवाशी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले तरूण उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते नितीन चिलवंत यांनी ही संकल्पना मांडली.
या उपक्रमांतर्गत नितीन चिलवंत आणि इतर पालकांनी साने गुरुजी वाचनालयास भेट स्वरूपात दिलेली पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात येतात. यामध्ये जेईई,नीट,एमएच-सीईटी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे.
तसेच बारावीत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी या पुस्तकाची मोफत देवघेव करावी व ही पुस्तके अभ्यासासाठी वापरावीत असे आवाहन साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मिटकरी यांनी केले. यावेळी वाचनालयाचे विश्वस्त तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
