अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
भिम आर्मी,आजाद समाज पार्टी,उतरणार आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मैदानात व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जाहीर पाठिंबा….
रावेर प्रतिनिधी प्रविण तायडे
सरंजामशाही व्यवस्थेला नाकारून लोकशाही बळकट करण्यासाठी व सर्वसामान्य मतदार बांधवांना त्यांचे हक्क,अधिकार व मूलभूत सुविधा पुरवण्याच्या हेतूने समाजकारण करीत असतांना राजकारणात देखील भिम आर्मी आजाद समाज पार्टी ने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याने,
आगामी काळात महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सहभागी होऊन जळगांव जिल्ह्यात निवडणूक लढवण्याचे सूतोवाच केले मात्र स्वबळाबर लढायचे की समविचारी पक्षासोबत युती करून लढायचे याबाबतचा चर्चा करून निर्णय घेऊ असे नमूद केले.
त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागणी होत आहे मात्र मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याने पुन्हा समाजाला आंदोलन करावे लागतेय तरी या संपूर्ण लढ्यात “भिम आर्मी” भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा युनिट मराठा बांधवांच्या सोबत आहोत व जिल्ह्यात कुठेही आंदोलन असेल तर आमचे समर्थन राहील असे देखील नमूद केले.
त्याचप्रमाणे भुसावळ रेल्वे विभागात एस.सी.एस.टी आरक्षण अंतर्गत विभागातील रिक्त पदांवर पदोन्नती ने भरती केली जावी असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असून देखील भुसावळ रेल्वे विभागातील समानता मंच चे पदाधिकारी व चीफ लोक इन्स्पेक्टर अमित सक्सेना व व्ही.के.दुबे यांचा विरोध आहे व पद रिक्त ठेवल्या जात आहे तरी त्याविरोधात देखील त्यांचेवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन केले जाईल असे.
“भिम आर्मी” भारत एकता मिशन,जळगाव जिल्हा प्रमुख मा.गणेश भाऊ सपकाळे व जामनेर तालुका प्रमुख व जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.प्रबुद्ध खरे यांनी भुसावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ठ केले.
तसेच सदर पत्रकार परिषद प्रसंगी “भिम आर्मी” भारत एकता मिशन,जळगाव जिल्हा प्रमुख मा.गणेश भाऊ सपकाळे ,जळगाव जिल्हा उपप्रमुख मा.मुदस्सर भाई खान,जामनेर तालुका प्रमुख व जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.प्रबुद्ध खरे,जिल्हा सचिव मा.वैशाली ताई पाटील,जिल्हा संघटक मा.संदीप भाऊ सपकाळे,भुसावळ तालुका प्रमुख मा.जावेद भाई शेख,तालुका उपप्रमुख मा. अल्केश भाऊ मोरे,रावेर तालुका उपप्रमुख मा.जुम्मा भाऊ तडवी,चोपडा तालुका प्रमुख मा.मुबारक भाऊ तडवी,तालुका संघटक मा.विशाल भाऊ वाघमारे,फैजपूर शहर प्रमुख मा.मोसीन भाऊ तडवी व मोठ्या प्रमाणात जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
