अतिशय दुःखद बातमी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे कॅन्सरने निधन 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रतिनिधी मुकूंद मोरे
अतिशय दुःखद बातमी .प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे कॅन्सरने निधन.३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मराठी कलाविश्वाला धक्का देणारी ही बातमी आहे. तुझेच मी गीत गात आहे मालिकेतून तिने एक्झिट घेतली होती, तिच्या जागी तेजस्विनी लोणारी हिने ती भूमिका निभावली. त्यानंतर प्रिया मराठे कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये दिसली नाही. आज तिच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धाजली
या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत,कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या.प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली.
काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सर च निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली.
नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली.
पण त्या कॅन्सर ने काही तिची पाठ सोडली नाही.
” तू भेटशी नव्याने ” या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला.
पण अखेर तिची ताकद कमी पडली
