अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
धाराशिव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्यामुळे पाहणी करून आमदार कैलास पाटील यांनी गावातील नागरिकांना आवाहन केले तात्काळ पंचनामे करावेत
प्रतिनिधी मुकूंद मोरे
आजअंबेजवळगा येथे जाऊन शेतकरी व अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली अतिवृष्टी झाल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सोयाबीन, उडीद मुग, तुर ही सर्वच पिके बाधीत झाली आहेत. शेतामध्ये पाणी साठुन राहिल्याने सोयाबीन, उडीद, मुग, तुर इत्यादी पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच फुलगळ झालेली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. सोयाबीन पिकावर मुळकुज, मानकुज आणि शेंगकरपा अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे त्यामुळे सर्वच पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत . धाराशिव ग्रामीण मंडळातील सर्व गावातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या
याप्रसंगी सातपुते सर , आबा सारडे,सत्यवान चांदने,कलीम शेख आप्पा सारडे दत्ता बीरंजे दादा बिरंजे उमेश यादव, मुबारक शेख ओंकार सरडे
