अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
बिलोली तालुक्यात ओला दुष्काळ, जाहीर करा
पत्रकार गणेश गिरगावकर यांची मागणी
मारोती एडकेवार नांदेड /जिल्हा प्रतिनिधी
नांदेड: बिलोली तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगफुटी झाल्याने तसेच निझामसागर धरण,मन्याड,लेंडी,बारूळच्या तळयातून मोठ्या प्रमाणात मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग असल्याने. मांजरा नदीत 05 लाख क्युसेक पाणी सोडल्याने मांजरा नदीला महापुर आल्याने 1983 च्या महापुराची पुनरावृत्ती झाली .बिलोली तालुक्यातील शेती शिवारातून वाहणारे नाले मांजरा नदीत विसर्ग होतात.परंतु मांजरा तुडुंब भरून वाहत असल्यामुळे शेती नाल्यातील येणारे पाणी उलट्या दिशेने वर वाहत असल्यामुळे ते सर्व पाणी शेतीत शिरल्याने शेतात पाणी कि पाण्यात शेती अशी अवस्था निर्माण झाले.हजारो एकर जमीनीतील पिके पाण्यात आले. हातातोंडाशी आलेले उडीद,मुग,तुर, सोयाबीन पिके पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी खुप मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक सोयाबीन आहे .पिकांची अवस्था फुल कोवळी शेंगा असल्याने हाताला आलेली पिके सडून गेले . .शेतातून पाणी अतिवेगाने वाहत असल्यामुळे अनेक जमिनी खरडून गेली.मांजरा नदीचे पाणी बिलोली तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर घरातील अन्नधान्य सर्वच पाण्यात वाहून गेल्याने एका वेळेचे अन्नधान्य खाण्यासाठी शिल्लक राहिलेले नाही. बिलोली तालुक्यातील जवळपास सर्वच गावात पाणी शिरल्याने नागरिक दिवस रात्र जागून काढत आहेत.घराघरात पाणी पाणी शिरल्याने कच्ची घरे पडण्याच्या अवस्थेत आहेत.अशा गावातील नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत करा . शासणाने ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावे.यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश गिरगावकर, ता.उप अध्यक्ष प्रकाशराव फुगारे,रामलू ओनरवाड गंजगावकर, गंगाधर मिनकीकर, आकाश मिनकीकर यांची उपस्थिती होती.
