अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर
मराठमोळं मुलुंड’ संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी सालाबादप्रमाणे या वर्षीही ‘मराठमोळं मुलुंड’ आणि ‘मुलुंडचा राजा’ यांच्या संयुक्त विद्यमाने, मुलुंडचा राजा, मुलुंड (पूर्व) येथे सामुदायिक श्री.गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन…
‘मराठमोळं मुलुंड’ संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी सालाबादप्रमाणे या वर्षीही ‘मराठमोळं मुलुंड’ आणि ‘मुलुंडचा राजा’ यांच्या संयुक्त विद्यमाने, मुलुंडचा राजा, मुलुंड (पूर्व) येथे सामुदायिक श्री.गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सामुदायिक अथर्वशीर्ष पठणात मुलुंडकरांनी उत्स्फुर्त सहभाग घ्यावा, ही विनंती.
दिनांक: बुधवार, ३ सप्टेंबर २०२५
वेळ: संध्याकाळी ५.३० वाजता
स्थळ: “मुलुंडचा राजा” श्री गणेश मित्र मंडळ, वासुदेव बळवंत फडके मार्ग, गव्हाणपाडा, आकृती टॉवर शेजारी, मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१.
ठीक ५.३० वाजता अथर्वशीर्ष पठणाला सुरूवात होईल.
सौ. प्राची सोमण (उपाध्यक्षा)
मराठमोळं मुलुंड
