अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
हाजी जुबैर मेमन यांची आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती
पुणे | महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक हाजी जुबैर मेमन यांची आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते (महाराष्ट्र प्रदेश) गौरीप्रसाद उपासक, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोनीस साठे आणि महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष सुलतान शाह यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले,
या प्रसंगी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हाजी जुबैर मेमन यांच्या समाजकार्यातील योगदानाची व राजकीय अनुभवाची प्रशंसा केली आणि त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रात पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
हाजी जुबैर मेमन यांनी या जबाबदारीसाठी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले व समाजातील सर्व घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी झटण्याची भूमिका स्पष्ट केली.
