अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वसमत तालुक्यातील सावंत बोरी गावातील मराठा समाज बाधवाकडुन मोठे योगदान
वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथील मराठा समाज बांधव
प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील
8 क्विंटल भाकरी.2 क्विंटल ठेचा.1 क्विंटल दशमी.2क्विंटल पुरी.1 क्विंटल लोनच.1 क्विंटल फराळ. व इतर साहित्य घेऊन मुंबई कडे रविवारी रोजी सकाळी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवाना मदत म्हणून बोरी सावंत येथून मुंबई येथील आझाद मैदानावर घेऊन निघाले.
उपोषणाला बसलेल्या उपोषण कर्त्या बांधवानाचा आजचा तिसरा दिवस सुरू असुन त्या ठिकाणी असलेल्या समाज बांधवांना गेल्या दोन दिवसांपासून त्या ठिकाणी गैरसोय होत असल्याने राज्याच्या अनेक ग्रामिन व शहरी भागातुन जेवनाची व्यवस्था सुरू आहे त्या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांचा अमरण उपोषणाला राज्यातील अनेक भागातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबई मध्ये दाखल झाला असून त्या ठिकाणी मराठी माणसाची मोठी गैरसोय होत असल्याचे मोर्चात सहभागी असलेल्या समाज बांधवांनी मुंबई मधुन गावाकडे निरोप दिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनसागर मराठी माणसाचा उसळला आहे त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या मराठी माणसाला खायला व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नाही आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या ठिकाणा पासुन चार किलोमीटर अंतरावर सर्व व्यवस्था बंद आहे.व काहि ठिकाणी अम्हिच रस्त्यावर स्वतः आलेल्या स्वयंपाका चे सामान घेऊन स्वयंपाक करत आहोत तर या भागातील लाईट प्रशानाने बंद केली त्यामुळे आमच्यावर उपास मारीची वेळ आली आहे आमची मोठी गैरसोय होत असल्याचे बोलल्या जात होते त्यामुळे
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बोरी सावंत या ठिकानच्या मराठा समाज बांधवांनी गावातील मराठा समाजाला या संदर्भात माहिती दिली व काही क्षणात गावातील नागरिकानी एकत्र ऐकुन आठ क्विंटल भाकरी दोन क्विंटल हिरव्या मिरच्याचा ठेचा एक क्विंटल दशमी दोन क्विंटल पुर्या व एक क्विंटल लोनच एक क्विंटल पेशा जास्त महालक्ष्मी सन्मानित फराळ केलेला मुंबई कडे रात्री उशिरापर्यंत गाडीने रविवार रोजी सकाळी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या नागरिकांना जेवणाची व्यवस्था केली आहे.
श्री श्रीहारी अंभोरे पाटील
