एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आत्महत्येच्या वाटेवर असलेल्या दोघींचे दामिनींनी वाचवले प्राण

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

आत्महत्येच्या वाटेवर असलेल्या दोघींचे दामिनींनी वाचवले प्राण

दामिनी मार्शल ठरताहेत महिलांसाठी सुरक्षा कवच

संपादकीय

कोथरूड पोलिस स्टेशनअंतर्गत कार्यरत दामिनी मार्शल महिला व मुलींसाठी खऱ्या अर्थान सुरक्षा कवच ठरत आहेत. दामिनी मार्शल महिला पोलिस शिपाई श्रुती कढणे आणि आरती जाधव या दोघी मागील आठवड्यात दामिनी मार्शलनी दोन गंभीर घटनांमध्ये तत्काळ हस्तक्षेप करून आत्महत्येच्या वाटेवर असलेल्या दोन महिलांचे प्राण वाचवले.

२२ ऑगस्ट रोजी कोथरूड परिसरातील करिष्मा सोसायटी येथे दामिनी पथकाला एका लहान मुलीकडून फोन आला. तिची मोठी बहीण (वय २६) मानसिक तणावाखाली असून, औषध सेवन करून बेशुद्ध पडल्याची

श्रृती कढणे आरती जाधव

माहिती मिळाली. श्रुती कढणे व आरती जाधव तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी बेशुद्ध मुलीला शुद्धीवर आणून तिला धीर दिला. घटस्फोटाच्या प्रकरणामुळे ती मानसिक नैराश्यात गेली असल्याचे समोर आले. दामिनी पथकाने तिच्याशी समजूत काढून संवाद साधला व आत्महत्येपासून परावृत्त केले. नंतर तिच्यावर वैद्यकीय उपचार केले.

२३ ऑगस्ट रोजीही अशाच प्रकारची घटना घडली. मृत्यूंजय मंदिराजवळील मयूर कॉलनीतील एका सोसायटीत २५ वर्षीय महिला तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या तयारीत होती. पती व सासरच्यांनी तिला घरात न घेण्यामुळे ती निराश झाली होती. दामिनी

आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण

श्रुती कढणे या राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेत्या बॉक्सिंग खेळाडू असून, त्या स्वतःच्या अनुभवाचा उपयोग करून शाळा कॉलेजमधील मुलींना सेल्फ डिफेन्सचे मार्गदर्शन करतात. दामिनी पथक सतत महिलांशी, विद्यार्थिनींशी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत जनजागृती करते. गुड टच, बॅड टच, पॉस्को कायदा, आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देते.

पथकाने तिला समजावून सांगत धीर दिला.

प्रत्येक अडचणीला मार्ग असतो, स्वतः चा जीव घेणे चुकीचे आहे, असे सांगत तिला सुरक्षितपणे आई- वडिलांसोबत पाठवले. दोन्हीही घटनांमध्ये पीडित महिलांनी या धाडसी दामिनींचे आभार मानले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाचे काम सुरू आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link