अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नेमसुशिलचे ऑपरेशन सिंदूरची भारतीय वायू सेना विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी घेतली दखल
कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
तळोदा :- नेमसुशिल शैक्षणिक समूहात दरवर्षी गणपती बाप्पांची स्थापना करण्यात येत असते प्रसंगी सामाजिक व प्रबोधनात्मक प्रेरणा देणारे देखावे देखील सादर केले जात असतात नुकतेच पार पडलेले भारत पाक युद्धाची धुरा सांभाळणारी *भारतीय वायू सेना दलाची विंग कमांडर व्योमिका सिंग* यांनी नेमसुशिल शैक्षणिक समूहातील *ऑपरेशन सिंदूर* देखाव्याला प्रतिसाद देत आपल्या *इन्स्टाग्रामवर पेज* वर नेमसुशिल शैक्षणिक समूहाच्या देखाव्यास मानाचे स्थान देत कौतुकास्पद अभिनंदन केले आहे.
व्योमीका सिंग यांच्या इंस्टा पेज वर नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा सामाजिक संदेश देणारा ऑपरेशन सिंदूर देखाव्यास प्राधान्य व विद्यामंदिराचे विशेष कौतुक केल्याबद्दल नेमसुशिल शैक्षणिक समूहातर्फे वीरकन्या व्योमिका सिंग यांचे विशेष आभार मानण्यात आले.
