अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
एडवोकेट योगीता सावंत यांचे माहीम चौपाटीवर गणेश विसर्जनावेळी प्रसाद वाटप व वाहतूक सहकार्य
मुंबई प्रतिनिधी प्रमुख किशोर गुडेकर
मुंबई │ माहीम चौपाटी येथे 28 ऑगस्ट 2025 रोजी गणेश विसर्जनाचा सोहळा भाविकांच्या उत्साहात पार पडला. या वेळी गणेश भक्तांना प्रसाद वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विसर्जनाच्या काळात वाहतूक पोलीसांना सहकार्य करून वाहतूक कोंडी टाळण्यास मदत झाली.
सामाजिक बांधिलकी जपत अॅडव्होकेट योगीता सावंत यांनी हा उपक्रम राबविला. त्यांनी गणेश भक्त, महिला व लहानग्यांना स्वतःहून प्रसाद वाटप केले. विशेष म्हणजे वाहतूक पोलिस व अन्य कर्मचाऱ्यांनाही या उपक्रमाचा लाभ मिळाला.
स्थानिक नागरिक व भक्तांकडून या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक करण्यात आले. योगीता सावंत यांनी सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा आपला संकल्प या उपक्रमातून अधोरेखित केला.
