अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
करंजखोप मधील गणेश मंडळांच्या आरतीचे मानकरी कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने..!!
संगीता इंनकर सातारा जिल्हा प्रतिनिधी
सध्या सर्वत्र सन 2025 गणेशोत्सवांची धामधूम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वत्र ठिकाणी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या गावच्या हद्दीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आरतीसाठी निमंत्रित करण्यात येत असून. प्रशासकीय अधिकारी हे आपला अनमोल वेळ देवुन आरतीसाठी प्रामुख्याने उपस्थित राहत आहे. उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावातील वाघजाई विकास मंडळ, पाराखालचा सम्राट मंडळ, आणि कै. उदयसिंह धुमाळ युवा प्रतिष्ठान नवसाला पावणाऱ्या करंजखोपच्या पिंपळा खालच्या राजाच्या आजच्या आरतीचे मानकरी म्हणून… वाठार पोलीस स्टेशनचे आदरणीय सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने साहेब यांना मंडळाच्या वतीने देण्यात आला. यावेळी आदरणीय साहेबांचे शाल,श्रीफळ देवुन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आदरणीय सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आपल्या संदेश माध्यमांतून गणेश उत्सव आनंदात साजरा करा,पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असा संदेश उपस्थित दरम्यान केला. पोलीस प्रशासन तुमच्या नेहमीच सेवेत आहे. यावेळी आदरणीय साहेबांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून करंजखोप गावातील तिन्ही गणेश मंडळांचे विशेष कौतुक केले,
