अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
राष्ट्रीय क्रीडा दिन थेपडे विद्यालय म्हसावद येथे जल्लोषात साजरा
जळगांव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
आज २९ ऑगस्ट २०२५ हा दिवस हॉकीच्या महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे महानायक म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे योगदान भारतीय क्रीडा क्षेत्राला अमूल्य आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस *राष्ट्रीय क्रीडा दिन* म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद ता जि जळगाव या विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. प्रथमता हॉकीचे महानायक ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर , उप मुख्याध्यापक जी डी बच्छाव सर, पर्यवेक्षक के पी पाटील सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण सर व विद्यार्थ्यांचे पालक समाधान वाघ यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका सौ एच डी हूजरे, श्री एस एम नेतकर सर, श्री एस सी बाविस्कर सर व श्री एन के अहिरे सर व खेळ शिक्षक प्रमुख पी ए महाजन सर गिरासे सर उपस्थित होते. त्यानंतर कबड्डी या खेळाचे दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सहकार्य केले.
