अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महान लेखक, कादंबरीकार कै. सहास शिरवळकर सु.शि यांच्या अप्रकाशित असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन
प्रतिनिधी राजेंद्र शिर्के पुणे
पुणे आज दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता,टिळक रोडवरील संचेती सभागृह नीतू मांडके हॉल येथे संपन्न झाला.
सुहास शिरवळकरांच्या आस्तित्व या अप्रकाशित कादंबरीचं व त्यांच्या कविता या काव्यसंग्राहाचे प्रकाशन सोहळा पार पडला. सन १९९२-१९९३ च्या दरम्यान लिहिलेली ही कादंबरी ११ जुलै २००३ ला सुहास शिरवळकर गेल्यानंतर आज २०२५ ला या कादंबरीचं प्रकाशन सोहळा झाला त्याचबरोबर सुहास शिरवळकर यांच्या काव्यसंग्रह ही आज प्रकाशित झाला. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अभिनेते श्री सुबोध भावे सर आणि आणि सध्या खूप चर्चेत असलेले कवी,गीतकार असलेले वैभव जोशी सर यांच्या हस्ते झाला.










