अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नूतन प्राथमिक शाळा,सेलू येथे कृष्ण जन्माष्टमी निमित्त कृष्ण रूप स्पर्धा संपन्न.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सेलू येथील सौ. सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहानी नूतन प्राथमिक शाळा सेलू येथे दि.29 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी निमित्त कृष्ण रूप सजावट स्पर्धा आयोजित केली होती.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्या पक उल्हास पांडे पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष सौ. इंगोले वर्षा उपस्थित होते. या समारंभात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गोपाल कृष्णाच्या गाण्यावर नृत्य सादरीकरण केले. त्यांना मार्गदर्शक वर्ग शिक्षकांचे लाभले. कृष्णरूप सज्जा करिता उत्स्फूर्त बालगोपालांचा सहभाग लाभला. या स्पर्धेत परीक्षक म्हणून पालक शिक्षक संघातील सदस्य सौ. सुनिता देशमुख व सौ.आढाव अनुराधा, प्रशालेतील शिक्षिका सौ. कुंभार रामकोर व सौ. जहागीरदार संपदा ह्या होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक जाधव एकनाथ, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.डोळस रेखा व सर्व सहकारी मित्रांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.सोनाली कुबरे यांनी मानले.









