अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
युवराज पाटील यांनी पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, अकोला वाशिम,सातारा लातूर,जळगांव येथे उत्कृंष्ट सेवा..!!
संगीता इंनकर पुणे जिल्हा प्रतिनिधी
जळगांव जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. युवराज पाटील यांची पुणे जिल्हा माहिती अधिकारी या ठिकाणी प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांनी आपल्या जळगांव मधील सेवाकाळातील अनुभव, आणि आठवणी व भावनिक प्रवास त्यांनी स्वतःच्या शब्दांत व्यक्त केला आहे. जळगांव ने मला समृद्ध अनुभव दिला चांगल्या लोकांचा सहवास मिळाला विश्वांस दिला आणि काम करताना समाधान मिळाले, आदरणीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेळोवेळी माझ्यावर विश्वास दाखवला नवनवीन आणि आव्हानात्मक जबाबदाऱ्या दिल्या. त्या जबाबदाऱ्यांतून मी स्वतःला अजून अधिक सक्षम घडवू शकलो, जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्गाचा पाठिंबा हो पुढे जा म्हणणारा स्नेह ही माझ्या प्रवासांची खरी शिदोरी ठरली. आता मी नव्याने ( दिनांक 28 ) रोजी पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. श्री. पाटील यांनी यापूर्वी सहाय्यक संचालक मंत्रालय,सहाय्यक संचालक विभागीय माहिती कार्यालय पुणे, तर अकोला वाशिम सातारा लातूर आणि जळगांव येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम पाहिले आहे. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत शासनांच्या विविध लोककल्याणकारी योजना,उपक्रम आणि विकास कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोचवणारा महत्त्वांचा दुवा मानला जातो. शासनांची ध्येयधोरणे आणि जनहिताचे कार्यक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. असेही नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
