एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे सहकारनगर पोलिसांची धमाकेदार कामगिरी

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

पुणे सहकारनगर पोलिसांची धमाकेदार कामगिरी

पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव

सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर पिडीत महिलेचे आक्षेपार्ह व्हिडीओ फोटो सोशल मिडियावर प्रसारीत करणा-या आरोपीस परराज्यातुन शोध घेवुन केली अटक

दि.०२/०७/२०२५ रोजी फिर्यादी यांना त्यांचे राहते घरी आरोपी नामे विक्रम चंद्रकांत बुटीया यांनी आणलेली दारुची बाटली फिर्यादी यांनी लपवून ठेवल्याने त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यानी मारहाण करीत असताना फिर्यादी खाली पडले तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना घरातील लाकडी बांबूने पाठीवर दोन्ही पायावर दोन्ही हातावर मारहाण करुन जखमी केले म्हणून सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. २७४/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ अन्वये दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्हयातील आरोपी विक्रम बुटीया याने फिर्यादी यांनी तक्रार दिल्याचा राग मनात धरून दि.०७/०७/२०२५ रोजी फिर्यादी यांचे आरोपीकडे असलेले आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करुन पुणे शहरातुन पलायन केले होते. परंतु आरोपी हा सोशल मिडियावर फिर्या दी यांचे सतत आक्षेपार्ह फोटा व व्हिडीओ प्रसारीत करीत असल्यामुळे फिर्यादी या डिप्रेशनमध्ये जावुन त्यांची मानसिकता आत्महत्या करण्याइतपत पोहचली असल्याचे माहिती मिळाली. त्यावेळी गरोसा सेल येथे त्यांची समजुत काढली. तसेच फिर्यादी राहत असलेल्या प्राप्त माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन श्री. विठ्ठल पवार यांनी पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस अंमलदार जयश्री शेळके, प्रज्ञा नावडकर, पोलीस अंमलदार निखील राजीवडे यांना फिर्यादीचे विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील पत्यावर रवाना केले. त्यावेळी फिर्यादी या भरोसा सेल येथे पोहचल्यानंतर फिर्यादी यांची समजुत काढुन मा. पोलीस आयुक्त कार्यालय येथे घेवुन आले. पोलीस आयुक्त कार्यालय येथे मा. वरिष्ठांनी, वपोनि विठ्ठल पवार, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी फिर्यादी यांचे समुपदेशन करुन त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.

दिनांक १८/०८/२०२५ रोजी पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार अमोल पवार व किरण कांबळे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठांचे परवानगीने पोलीस अंमलदार अमोल पवार व किरण कांबळे हे आरोपीचा शोध घेणेकामी कर्नाटक राज्य येथे गेले असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर यांनी त्यांना गोपनी माहितीचे आधारे सदरचा आरोपी हा गोवा मापसा या दिशने ट्रक घेवुन गेल्याची माहिती दिल्याने सदर आरोपीचा पोलीस अंमलदार अमोल पवार व किरण कांबळे यांनी जमखंडी कर्नाटक राज्यातुन गोवा मापसा येथे आरोपीचा शोध घेतला. सदरचा आरोपी तेथुन महाराष्ट्राचे दिशेन गेल्याची माहिती मिळाल्याने आरोपीचा पाठलाग करीत आरोपीस सिंधुदुर्ग जिल्हातील बांदा तालुका या परीसरातील आनंदी हॉटेल येथील परीसरातुन

ताब्यात घेवुन रात्रीमध्ये प्रवास करुन आरोपीस सुरक्षितरीत्या पोलीस स्टेशन येथे आणले आहे. आरोपी नामे विक्रम चंद्रकांत बुटीया वय ३८ वर्ष धंदा चालक, रा. मु.पो. जमखंडी चौवडीया नगर, जिल्हा बागलकोट, कर्नाटक याचेकडे तपास करता आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२, पुणे शहर श्री. मिलिंद मोहीते मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे सुचनेप्रमाणे सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सपौफौ बापु खुटवड, दशरथ मोहिते, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, निखील राजीवडे, सागर सुतकर, महादेव नाळे, रविंद्र कदम, म.पोलीस अंमलदार जयश्री शेळके, प्रज्ञा नावडकर, यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link