अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
शहादा कनिष्ठ महाविद्यालयात बीज गणपती स्पर्धा संपन्न; गणरायाच्या मुर्त्यातून साकारणार वृक्षवल्ली सोयरे……
प्रा. डी. सी. पाटील नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
शहादा : येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात श्री गणरायाच्या उत्सवा निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत बीजगणपती स्पर्धा उत्साहात साजरी करण्यात आली.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश, जेष्ठ प्रा. व्हि. सी. डोळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. उर्मिला पावरा, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. के. आर. निंकुभ, सदस्य प्रा. मधुकर ठाकरे यांनी केले होते. कनिष्ठ महाविद्यालयातील मूर्ती कलाकार विद्यार्थ्यांकडून आद्य दैवत श्रीगणेशाची मूर्ती शाडू मातीपासून तयार करण्यात आली. त्यात महाविद्यालयातील 24 कलाकारांनी सहभाग नोंदवला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. कल्पना पटेल यांनी बीजगणपती ही संकल्पना व उपक्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. बीज गणपती म्हणजे पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती मूर्ती तयार करून त्या मूर्तीच्या आत झाडांच्या बिया लावण्यात आल्या. आणि विसर्जन करतांना एखाद्या डोंगरावर, नदीकाठी किंवा नर्सरीमध्ये आपण मूर्ती विसर्जन केले तर त्यापासून रोपे तयार होतील, असे महत्त्व सांगितले. या स्पर्धेचे परीक्षण कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश आणि जेष्ठ प्रा. व्ही .सी. डोळे यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश समोर ठेवून स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.लक्ष्मण बोरसे, प्रा. मनोज चौधरी, प्रा. डॉ. डी. डी. पटेल, प्रा. पंकज गुरव, प्रा. विना पाटील, प्रा. रेखा पाटील, प्रा. ममता पाटील, प्रा. सौ. वर्षा नेरकर, प्रा. प्रियंका पाटील, प्रा. सविता पाटील व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार व सुदाम सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले .
या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एम.के.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
