अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
यावल येथे आज जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा जिल्हा मेळावा.
प्रतिनिधी यावल दि.२९ सुरेश पाटील
येथील बोरावल गेट जवळील पद्मावती हॉलमध्ये सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा जिल्हा मेळावा राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यकारणी, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यावल तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा मेळावा केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आमदार अमोल जावळे,आमदार चंद्रकांत सोनवणे,यांच्या व स्वस्त धान्य दुकानदार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डी.एन.पाटील,जनरल सेक्रेटरी चंद्रकांत यादव,उपाध्यक्ष भागवत पाटील,राजेश अंबुस्कर, उपाध्यक्ष महेंद्र बोरसे,विभागीय अध्यक्ष सुनील जावळे,जळगाव जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील,सुनील पाटील,सचिव सुनील अंभोरे, प्रसिद्धी प्रमुख कैलास उपाध्याय, जिल्हा संघटक प्रशांत ( बाळा )
भालशंकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे,स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा मेळावा यशस्वी होण्यासाठी यावल तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष तथा मुख्य आयोजक सुनील नेवे उर्फ बाळू नेवे,तालुका उपाध्यक्ष शेख अब्दुल्ला,सचिव दिलीप मोरे, कार्याध्यक्ष अजय कुचेकर,सदस्य नितीन माहुरकर,दिलीप नेवे,विजय गजरे यांनी उत्कृष्ट नियोजन केले असून जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
