अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कोथरूडमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव : गणेश आरतीचा मान देत श्रमदेवतेला सलाम
पुणे प्रतिनिधी संजय धर्मे
कोथरूड येथील मोरे श्रमिक वसाहतीमधील शिपाईचाळ मित्र मंडळाने सामाजिक जाणीव ठेवत एक स्तुत्य उपक्रम राबवला. या मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील कचरावेचक महिलांना गणपतीच्या आरतीचा मान देत त्यांचा यथोचित सन्मान केला.
स्वच्छता कर्मचारी हे समाजातील खरे हिरो आहेत. ते निस्वार्थ भावनेने शहराच्या स्वच्छतेसाठी कार्य करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत शिपाईचाळ मित्र मंडळाने गणेश आरतीत सहभागी करून आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला.
मंडळाचे अध्यक्ष सत्यम जयवंत देवकर म्हणाले, “खरे नायक हे स्वच्छता कर्मचारीच आहेत. त्यांच्याकडून राजकारणी आणि नागरिकांनी प्रेरणा घ्यायला हवी.”
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष महेश पाटील, कार्यकर्ते सुमित कांबळे, अक्षय भालेकर, अनंत सव्वाखंडे, सुमित मुळीक, आकाश जाधव, धनराज काटकर, तसेच प्रभाग समन्वयक माधुरी श्रीखंडे, वृषाली थोरात, लक्ष्मी पारडे, संगीता कदम, पद्मिनी डोलारे, मीना चव्हाण, शालन कदम, तुळसा कदम उपस्थित होते.
स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्यांचा असा सन्मान हा समाजात सकारात्मक बदल घडवणारा आदर्श ठरत आहे. शिपाईचाळ मित्र मंडळाचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.








