अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सेलु महावितरण कार्यकारी अभियंता कार्यालयात जाणाऱ्या रस्त्याची गैरसोय.
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू :सेलु येथे नागरीकाच्या सोई साठी परभणी येथील कार्यकारी अभियंता कार्यालया ची सोय तर झाली परंतु कार्यालयात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची मात्र गैरसोयच झाली आहे. दररोज येथे जिंतूर, सोनपेठ,पाथरी,मानवत व सेलु तालुक्यातील हजारो नागरीक यांचे येणे जाणे करतात परंतु आत प्रवेश करण्याचा मुख्य रस्ता गैरसौयीचा आहे या ठिकाणी कार्यकारी अभियंता कार्यालय, उप अभियंता कार्यालय, कनिष्ठ अभियंता कार्यालय,ग्रामीण कार्यालय, वीजबिल भरणा केंद्र व ईतर संलग्न कार्यालय आहेत येथे कायम येणे जाणे करणारांची वर्दळ आसते महिला, जेष्ठ नागरीक, शेतकरी, व्यापारी, वीजवितरण कामाशी निगडीत संर्व कामे करणारी नागरीक येथे येतात परंतु या चिखलाच्या रस्तावर कसरत करत त्याना आपली कवायत करत वाहने चालवावी लागतात, महिला तर आलीकडेच आपली स्कुटि लावुन चालत जातात, तर बाकी नागरीक व कर्मचारी तारेची कसरत आपली वाट काढतात या कार्यालयात कनिष्ठ अभियंता हे पद बरेच दिवस रिकामे होते दहा दिवसा पुर्विच या जागी कनिष्ठ अभियंता रूजु झालेत परंतु ते हि कार्यालयात खुप कमी वेळ बसतात आणी कार्यालयास दोन दोन तास कुलुप लावलेले आसते असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे ता.अध्यक्ष जाधव सतीश यांनी स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवरून ते म्हणतात, सोलार ची रखडलेली कामे ,बिज बिल वाठवुन आलेली कामे तेहि वेळेवर होत नसलेल्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत ,विज समस्या कायमची आहे. कनिष्ठ अभियंताचा फोन बंद असने अशा देखील तक्रारी या कार्यालयाच्या आहेत.या संर्व विषयी लवकरात लवकर मार्ग निघेल अशी अपेक्षाच धरून चालावे लागेल कारण हा विज मंत्र्याचा मतदार संघ आहे आणी त्यांच्याच मतदार संघात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे अशी नागरिकात चर्चा कायमच असते याची दखल लवकर महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने घ्यावी हिच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.









