अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
स्नेहबंध फौंडेशनकडून राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा.
प्रतिनिधी -सारंग महाजन
अहिल्यानगर – पुणे, बालेवाडी येथे येत्या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेसाठी भिंगार, अहिल्यानगर येथील भिंगार स्पोर्ट्स क्लब – सबका क्लबच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. स्थानिक पातळीवर मेहनत घेतलेल्या या खेळाडूंना आता राज्यस्तरावर आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली असून शहराच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. या प्रसंगी स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शिंदे म्हणाले, “खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात सातत्य ठेवून मेहनत घेतली, तर ग्रामीण व शहरी भागातील अनेक मुलांना मोठ्या व्यासपीठावर पोहचता येईल. स्नेहबंध फौंडेशन क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांना नेहमीच पाठबळ देईल.”
विद्यार्थ्यांना प्रशिक्षक मेजर विठ्ठल काळे व शंकर औरंगे यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय पातळीवर निवड शक्य झाल्याचे मत व्यक्त केले.
( फोटो ओळ )
जिल्हास्तरीय अॅथलेटिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे.








