अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
धापेवाडा येथील वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले सांत्वन
मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसह विविध शासकीय योजनेअंतर्गत सहाय्यनागपूर, दि. २८ – जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बु. येथील शेतामध्ये वीज पडून २७ ऑगस्ट रोजी वंदनाताई प्रकाश पाटील व त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील तसेच शेतात काम करणाऱ्या मदतनीस निर्मलाताई रामचंद्र पराते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील व पराते कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेतील मृतांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शासनाच्या निकषानुसार मृत पाटील व पराते कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा मदतीसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत लाभ देण्यात आले. यावेळी आ. आशीष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे आदी उपस्थित होते.
कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. घडलेली घटना दुर्देवी असून दुःखाचा मोठा घाला कुटुंबीयावर झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने २४ तासांच्या आत कुटुंबातील व्यक्तीला मदत देण्यात आली आहे. पराते कुटुंबीयांच्या खात्यावर तत्काळ निधी जमा करण्यात आला असून पाटील कुटुंबीयांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहेत. मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
00000
