अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पूरग्रस्त नागरिकांना, जि. प. शाळा हिप्पारगा थडी व ग्रामपंचायत कार्यालयची मदत
मारोती एडकेवार जिल्हा/ प्रतिनिधी नांदेड
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये निजामसागर येथील धरणातून,पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला आहे.व सततच्या पावसामुळे मनाड नदी, व मांजरा नदीला मोठा पूर पुराची, परिस्थिती निर्माण झाली.अनेक घरांमध्ये पाणी साचल्यामुळे, देगलूर तालुक्यातील शेवाळा येथील नागरिक यांना,बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांची मदत.दी. 26 ऑगस्ट 2025 पासून सततच्या पावसामुळे, व तेलंगानातील निजामसागर धरणा मधून, पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्यामुळे, मांजरा नदी,मनाड नदीला, मोठा पूर आला आहे. व पावसामुळे अनेक गावांमध्ये जीवितहानी, व अनेक,घरांमध्ये पाणी साचल्यामुळे, व देगलूर तालुक्यातील शेवाळा, येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचल्यामुळे, पूरग्रस्त नागरिकांची. हिप्पारगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, व ग्रामपंचायत, यांच्याकडून व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, भुमय्या मृत्यूपोड सर, व ग्रामपंचायत सरपंच इनामदार रयबर, यांनी शेवाळा येथील, येथील सर्व नागरिकांची काळजी घेतली आहे.याबद्दल शेवाळा येथील, नागरिक यांनी हिप्पारगा थडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये निवारा मिळाल्यामुळे, समाधान व्यक्त केले आहे. मनाड नदी ला पूर आल्यामुळे, अनेक गावांमध्ये नागरिकांचे, बेहाल होत असून प्रशासन याकडे लवकरात लवकर, लक्ष देईल का?अशी प्रश्न सर्वसामान्य जनतेतून होत आहे,शेवाळा गाव हे हिप्परगा थडी पासून तीन किलोमीटर असल्यामुळे, शेवाळा येथील पूरग्रस्त नागरिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा थडी येथे,आश्रय घेतला व जिल्हा परिषद शाळा हिप्पारगा थडी व ग्रामपंचायत कार्यालय, मदत करत आहेत.
