अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
परतुर पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुस्क्या
परतुर भागातून सोलर केबल ची चोरी करणारे (03) आरोपींना अटक
एकूण (04) केबल चोरीचे गुन्हे उघडकीस 1,40,000/रुपयांचा मुद्देमाल जप्त
___________________________
परतुर प्रतिनिधि हनुमंत दवंडे
परतुर भागात सोलर प्लांट वर होणाऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री.बंसल यांनी आदेश करून सूचना केल्या होत्या.
त्यावरून दिनांक 27/08/2028 रोजी पोलीस ठाणे परतूरचे पोलीस निरीक्षक एस पी भागवत यांना माहिती मिळाली की, मोजे खांडवी तालुका परतुर येथे सोलर प्लांट वरील चोरी ही आरोपी नावे समीर काळे व याने त्याच्या साथीदारासह केली आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.
पोलीस ठाणे परतुर येथील अधिकारी आमदार यांनी संशयित आरोपी नामे समीर काळे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर चोरी त्याचे साथीदार नामे सय्यद असेफ व शेख गौस याच्यात यांच्यासह केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडे इतर होण्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांनी इतर तीन गुन्हे मोजे मसाला येथील Tata Solar येथे केल्याचे कबुली केली आहे.
सदर तिने आरोपी त्यांना अटक करून सदर तीनही आरोपींना वाटप करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल तांब्याचे वायर किमती 1,40,000/ रुपयांचे जप्त केले आहे.
सदरचीकामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अजयकुमार बसंल, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे परतुरचे पोलीस निरीक्षक श्री.एस.बी.भागवत, श्री. पल्लेवाड, पोउपनी, अंमलदार अशोक गाढवे, गजानन राठोड, ज्ञानेश्वर वाघ, नरेंद्र चव्हाण, राम हाडे, विजय जाधव, गोविंद पवार अच्युत चव्हाण, नितीन बोंडारे यांनी केलेली आहे.
