अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अ.भा.महात्मा फूले समता परीषद नागपूर जिल्हा पूर्व ग्रामिणतर्फे मनपाच्या आयुक्तांना दीले निवेदन.
नागपूर: महानगर पालिकेच्या पदभरतीत आरक्षण चोरी! ओबीसींना शून्य जागा ?
प्रतिनिधी सतीश कडू
ओबीसींच्या जागा आरक्षणानुसार भराव्याच लागतील.
ओबीसींचा DNA म्हणणाऱ्या शासनाने ओबीसींना भोपळा दिला आहे. हे खपवून घेतले जाणार नाही.
नागपूर महानगरपालिका नागपूर अंतर्गत 22 ऑगस्ट 2025 रोजी सरसेवेमार्फत गट ‘ क’ च्या विविध पदांच्या 174 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत प्रामुख्याने “कनिष्ठ लिपीक” या पदासाठी 60 जागा निर्धारित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाप्रमाणे 12 जागा देणे क्रमप्राप्त होते. परंतु जाहिरातीत ओबीसी प्रवर्गाला एकही जागा देण्यात आली नाही म्हणजे शून्य जागा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे “कर संग्राहक” या पदासाठी 74 जागा निर्धारित करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुद्धा ओबीसी प्रवर्गासाठी 14 जागा राखीव असणे आवश्यक होते. परंतु यातही सुद्धा ओबीसी प्रवर्गाला एकही जागा देण्यात आली नाही.
महानगरपालिकीने दिलेल्या जाहिरातीनुसार संपूर्ण 10 वेगवेगळ्या पदांसाठी 174 जागांपैकी 34 जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असायला पाहिजे होत्या. परंतु फक्त 6 जागा ओबीसींना देवून ओबीसींची बोळवण करण्याचा प्रयत्न पालिकेच्या माध्यमातून होत आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे. यास्तव आपण या विषयामध्ये लक्ष घालून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे. महाराष्ट्र शासनामधील नोकऱ्यांमध्ये अगोदरच १ लाख ३० हजार नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे. त्याला पुन्हा नागपूर महानगरपालिका हातभार लावत आहे. ओबीसींचा नोकऱ्यांमधील बॅकलॉग कसा वाढला हे या उदाहरांवरून स्पष्ठ दिसत आहे. याप्रसंगी अ.भा. महात्मा फूले समता परीषदेचे नागपूर जिल्हा संघटक मनोज गणोरकर, जिल्हा महासचिव सचिन मोहोड, उपाध्यक्ष योगेश ठाकरे, सचिव अविनाश वडे, उपाध्यक्ष सूरेद्र खडके नंदकीशार श्रोते, संतोष सिडाम, कीशोर राऊत, दोमोधर धूर्वे, निरज गौरकर यांची उपस्थिती होती.
